News Flash

कोकण विभागात अतिवृष्टी, ठाण्यात सर्वाधिक ३८० मिमी पाऊस

मुंबईत २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई व कोकण विभागात अतिवृष्टी सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. चोवीस तासांत ठाण्यात सर्वाधिक ३८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, श्रीवर्धन – २३० मिमी, पनवेल, माथेरान, उरण प्रत्येकी २१० मिमी, मुंबईत २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दोन दिवस सतत झालेल्या पावसानंतर आज देखील मुंबईत अतिवृष्टिचा इशारा हवामान विभागाने दिला होता. मुंबई, ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.

दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशात तयार झालेल्या चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) स्थितीमुळे दोन दिवस सलग पाऊस कोसळत आहे. चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता रविवारी कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याचबरोबर मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो, असे संकेत देण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 5:52 pm

Web Title: heavy rainfall in konkan region maximum 380 mm rainfall in thane msr 87
टॅग : Heavy Rain,Monsoon
Next Stories
1 विरोधकांना त्यांचं काम करु द्या, करोनाशी लढणं हीच आमची प्राथमिकता – आदित्य ठाकरे
2 मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पाऊस
3 ठाण्यात गंभीर करोना रुग्णांवर उपचारांचा पेच
Just Now!
X