गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर परतलेल्या पावसानं राज्यात ठाण मांडलं असून मंगळपासून त्याचा जोर वाढला आहे. पावसानं मंगळवारी रात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भाला झोडपून काढलं आहे. मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. दरम्यान, रायगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून, कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. पाऊस व रेल्वेचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 2:06 pm