News Flash

साताऱ्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस!

वीज पडून दहा शेळ्या, एक बोकड ठार; अनेक ठिकणी झाडंही जळाली

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज(गुरूवार) दुपारी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला. या पावसात वीज पडून माण तालुक्यात दहा शेळ्या व एक बोकड ठार झाले. वाई तालुक्यात नारळाच्या झाडावर वीज पडून झाडे जळून गेली. अनेक ठिकाणी पाडाला आलेले आंबे झडुन गेले तर झाडं पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सातारा,वाई, खटाव, माण, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, जावळी परिसरात आज दुपारी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला .या पावसाने सर्वत्र मोठे नुकसान केले . शिरताव (ता. माण) येथील माळ्याचा मळा या शिवारात दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज पडून दहा शेळ्या व एक बोकड ठार झाले, यामुळे शेतक-याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. येथील शेतकरी दगडू नामदेव लुबाळ हे त्यांच्या या शिवारात शेळ्या राखत होते. अचानक विजेच्या कडकटासह पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणून ते जवळच असलेल्या निवारऱ्याला गेले असता वीज शेळ्याच्या अंगावर पडल्याने दहा शेळ्या व एक बोकड ठार झाले.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून १ जूनला धडकणार

शेलरवाडी (ता.वाई) येथे नारळांच्या झाडांवर वीज पडल्याने नारळाची झाडं जळून गेली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उतरणीला आलेल्या झाडावरील पाडाचे आंबे झडून गेल्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठमोठाली झाडे वीज पडल्याने व वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 8:18 pm

Web Title: heavy rains accompanied by strong winds in satara msr 87
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 वर्ध्याच्या ‘जेनेटीक लाईफ सायन्सेस’ मध्ये ‘रेमडेसिविर’चे उत्पादन सुरू; गडकरींनी केली पाहणी
2 “पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका!”
3 लसीकरणात महाराष्ट्राची अव्वल कामगिरी! सर्वाधिक नागरिकांना मिळाले लसीचे दोन्ही डोस!
Just Now!
X