24 October 2020

News Flash

चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

झाडं उन्मळून पडली, विद्यूत खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत

चंद्रपूर शहर व जिल्ह्यात आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. दरम्यान घुघुस येथे बेलबंडीवर वीज कोसळल्याने शंकर वैद्य (33) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

चंद्रपुरात सायंकाळी ४ वाजता ढग दाटून आले  व मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  पावसाचा वेग इतका होता की, अवघ्या काही तासांत रस्त्यावर पाणी साचले, कस्तुरबा मार्ग, सिटी शाळा, आझाद बगिच्या, जयंत टॉकीज भागात पाणी साचले. पावसामुळे अनेक भागात झाडे कोसळली, तर वीज खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील गोल बाजारात देखील पाणी साचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 9:13 pm

Web Title: heavy rains disrupt life in chandrapur msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात ३७२१ नवे करोना रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू
2 स्थानिक संसर्ग वाढला; करोनाबाधिताच्या संपर्कात आलेले चौघे पॉझिटिव्ह!
3 लॉकडाउनमध्ये सरकट वीजबील पाठवल्याच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी
Just Now!
X