गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ाला शनिवारी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे गडचिरोलीतील सिरोंचा, अहेरी व भामरागड तालुक्यातील २०० गावांचा संपर्क तुटला असून आहे.
गडचिरोली व चंद्रपूर या जुळ्या जिल्ह्य़ात शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सिरोंचा-भामरागड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरून पाणी वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील १५० गावांचा संपर्क तुटला आहे. तिकडे अहेरी, एटापल्ली, धानोरा तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. सततच्या पावसामुळे वीज, दूरध्वनी पुरवठा खंडीत झाला आहे. व्यंकटपूर येथे काही घरांची पडझड सुध्दा झाली आहे. रस्ते बंद असल्याने बससेवा सुध्दा ठप्प झाली आहे.