रविवार सुट्टीचा वार असल्याने कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र त्याचवेळी मुसळधार पाऊस पडल्याने मंदिरात पूरस्थिती उद्भवली. कोल्हापूर मंदिर परिसर आणि शहरात पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंदिर परिसरात महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी शेजारील राज्यातले भाविकही दर्शनासाठी आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे या सगळ्यांचीच फजिती उडाली.

महालक्ष्मी मंदिर आणि परिसरात पावसामुळे पाणी साठले होते. भाविकांना वाहन पार्किंगसाठीही जागा मिळणे कठीण झाले होते. शाहू मैदान परिसर, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरापासून शिवाजी स्टेडियमपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच रस्त्यावरून भाविक मंदिराकडे ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक भाविक भिजतच मंदिराच्या दिशेने जात असल्याचे चित्र बघायला मिळाले.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
Rangpanchami was celebrated in Tuljabhavani temple in a devotional atmosphere
जगदंबेच्या मंदिरात सप्तरंगाची उधळण, भक्तीमय वातावरणात तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी

नवरात्र उत्सव काळात महालक्ष्मीची पूजा विविध रूपात बांधली जाते. रविवारी महालक्ष्मीची ‘अष्टभुजा महासरस्वती’ रुपातील पूजा बांधण्यात आली. अष्टभुजा सरस्वती ही दुर्गा सप्तशतीमधील उत्तम चरित्राची नायिका. तिचे नाव महासरस्वती असले तरीही ती दुर्गेचेच एक रूप. या देवतेच्या आठ हातांमध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण अशी आयुधे आहेत. ही देवता सिंहवाहिनी आहे. महालक्ष्मीचे हेच रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मात्र मुसळधार पाऊस झाल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली.