News Flash

सातारा, वाई, महाबळेश्वरमध्ये वादळी पाऊस, दोघांचा मृत्यू

सातारा- पाचगणी- महाबळेश्वर- वाई शहरासह ग्रामीण भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाला.

(संग्रहित छायाचित्र)

वाई: सातारा- महाबळेश्वर- पाचगणी- वाई- खंडाळा भागात आज ढगांच्या गडगडाटासह, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.कवठे (ता खंडाळा) येथील दोघांचा वीज पडून मृत्यू झाला.कळंबे (ता. सातारा) येथील मंदिराच्या घुमटावर वीज कोसळून नुकसान झाले.

सातारा- पाचगणी- महाबळेश्वर- वाई शहरासह ग्रामीण भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने उकाडय़ाने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. आज दिवसभर नागरिक उकाडय़ाने हैराण झाले होते.सर्वत्र आभाळ भरून आले होते. दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाली. काही वेळात मुसळधार पाऊस झाला. पाणीच पाणी करणारा हा पाऊस बराच वेळ सुरू होता.  कवठे (ता खंडाळा ) येथे शेतातील काम संपवून जेवण करण्यासाठी कोपीमध्ये बसलेल्या  शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५, झगलवाडी ता.खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय ६०,कवठे ता.खंडाळा)  या दोन जणांचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहे. कळंबे (ता. सातारा) येथील ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या घुमटावर वीज कोसळून मंदिराचे नुकसान झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:02 am

Web Title: heavy rains in satara wai mahabaleshwar 2 people died zws 70
Next Stories
1 सातारा : महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
2 Coronavirus : राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू
3 माजी खासदार दामू शिंगडा यांचे करोनामुळे निधन
Just Now!
X