News Flash

कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई व ठाण्यातही जोरदार पाऊस पडणार!

आज व उद्या संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातील बहुतांश भागासाठी 'येलो आणि ऑरेंज' अर्लट

संग्रहीत छायाचित्र

संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाडा व कोकणातील बहुतांश भागासाठी आज (मंगळवार) व उद्या (बुधवार) ‘येलो आणि ऑरेंज’ अर्लट आहे. कोकणात आज सिंधुदुर्गमध्ये सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सर्वदूर जोरदार पाऊस पडणार आहे. असे प्रादेशिक हवामान केंद्राच्या शुभांगी भुते यांनी सांगितले आहे.

उद्या (बुधवार) ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सर्वदूर व बहुतांश सर्व भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, गुरुवारी संपूर्ण कोकणात काही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, त्यानंतर त्याची तीव्रता कमी होत जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १५ ते १७ जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (१३ जुलै) मुंबई, रत्नागिरीसह कोकण विभागात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता कमी झाल्याने पावसाचा जोरही कमी झाला होता. कोकणात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असला, तरी मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र, कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढत असल्याने पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:09 pm

Web Title: heavy to very heavy rainfall of rainfall are expected in konkan msr 87
टॅग : Heavy Rain,Monsoon
Next Stories
1 गणेशोत्सवाप्रमाणेच बकरी ईद साजरी करण्याची संमती द्या, नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2 बैतूलमाल कमिटीकडून सामाजिक ऐक्याचे दर्शन; करोनाबाधित व्यक्तीचा हिंदू पद्धतीने केला अत्यंविधी
3 ३१ जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये राहणार बंद
Just Now!
X