News Flash

अवकाळी पावसाने भातपिके आडवी; कापलेल्या पिकांचे भिजून नुकसान

यंदा भाताचे भरघोस उत्पादन आले असताना सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा चिंताग्रस्त झाला

| November 6, 2013 03:57 am

यंदा भाताचे भरघोस उत्पादन आले असताना सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी उभी भातपिके आडवी झाली असून कापणी केलेल्या भाताचे नुकसान झाले आहे. जिल्’ाात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरीप मोसमात १ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. या वर्षी पाऊस चांगला आणि योग्य झाल्याने भाताचे भरघोस पीक आले असून यंदाच्या हं गामात सरासरी प्रतिहेक्टरी ४० िक्वटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यातच भाताच्या हमीभावातही शासनाने वाढ केल्याने बळीराजा सुखावला आहे. दिवाळीचा सण सुरू असला तरी भाताच्या कापणीचे काम जोरात सुरू आहे. निसर्गाने भरभरून पदरात टाकलेले दान साठवून ठेवण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे.
कडकडीत ऊन पडलेले असताना सोमवारी सायंकाळी अचानक आभाळ भरून आले. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. अलिबागमध्ये सुमारे पाऊण तास पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे कापणी केलेले पीक सुरक्षित घरी आणण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी कापलेली भातपिके शेतात साचलेल्या पाण्यात भिजून नुकसान झाले. काही ठिकाणी पिके आडवी झाली असून पाण्यात भिजताहेत. आता ही भिजलेली भाताची रोपे वाळविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दिवसभर आभाळ आभ्राच्छादित राहिल्याने शेतकरी चिंतातूर आहे. जर वेळीच चांगले ऊन पडले नाही तर भिजलेले धान्य खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. भाताचा पेंडाही भिजून कुजण्याची शक्यता आहे.
पावसामुळे दिवाळीच्या आनंदावरही विरजण पडले आहे. अचानक कोसळलेल्या सरींनी अनेकांची धांदल उडाली. अलिबाग शहरात नगर परिषदेतर्फे आयोजित दिवाळीच्या मफलीवर पाणी पडले. अलिबागकरांना मफल अर्धवट सोडावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 3:57 am

Web Title: heavy unseasonal rains claim great loss of paddy crop
Next Stories
1 अखेर सुरेश जैन जळगाव कारागृहात
2 मुस्लिमांना आरक्षण म्हणजे संघाला आयते कोलित
3 लोकांनी भ्रष्टाचाराविरोधात उभे राहावे -जयंत पाटील
Just Now!
X