मुंबई पुणे दृतगती मार्गावर सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुट्टीच्या दिवशी विशिष्ट कालावधीत आता अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या वाहनांमध्ये तीन एक्सल, मल्टी एक्सल आणि ओडीसी वाहनांचा समावेष असणार आहे. सुट्टीच्या आदल्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आणि सुट्टी समाप्त होण्याच्या दिवशी ठराविक वेळेत ही प्रवेश बंदी कायम असणार आहे. या कालावधीत दृतगती महामार्गावर खालापूर टोल प्लाझा ते उर्स टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

दर आठवड्याला शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी तसेच लागोपाठ दोन दिवस सुट्टय़ा आल्यास आदल्या दिवसापासून सुट्टी समाप्त होण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ठराविक वेळेत ही वाहतूक िनयत्रित केली जाणार आहे.

वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर के पद्मनाभन यांनी मोटर वाहन कायद्याच्या कलम ११५ अन्वये याबाबतची अधिसुचना पुढील तीन महिन्यासाठी जारी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर सातत्याने कोंडी होत असून त्यावर उपाय शोधण्याची मागणीही करण्यात येत होती. कधी असेल अवजड वाहनांना बंदी

  • शुक्रवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत
  • शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत
  • पुणे मुंबई दृतगती मार्गावर
  • रविवारी संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत
  • सोमवारी सकाळी ६.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत