पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत्या अपघातांमुळे पोलीस आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचं म्हणजे याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

याआधीही पुण्यात हेल्मेटसक्ती कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं होतं. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन निर्णयाचा निषेध केला होता. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते असा आक्षेप घेत आधी सार्वजनिक वाहतूक सुधारा, वाहतूक नियोजन तसंच रस्त्यांची स्थिती सुधारा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.