विजय राऊत

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी विक्रमगड तालुक्यातील  माण गावातील वीटभट्टीवरील कुटुंबांनी मदत पाठवली आहे.

माण गावातील बहुतेक कुटुंबे वीट भट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. कोल्हापूर आणि सांगलीतील अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. या पूरग्रस्तांना मदतीसाठी माण गावातील वीटभट्टीवरील मजुरांनी पूरग्रस्तांना धान्य, पैसे, कपडय़ांची मदत दिली आहे.

यासाठी गावातील प्रत्येक घरातून वर्गणी गोळा करण्यात आली. साडय़ा, कपडे लहान मुलांचे कपडे, धान्य, मीठ या वस्तू देण्यात आल्या. १८५ किलो तांदूळ, ५० किलो मीठ  २३२ किलो गव्हाचे पीठ आणि रोख रकमेच्या स्वरूपात मदत या वर्गणीतून करण्यात आल्याची माहिती विलास पाडवी यांनी दिली.

मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांकडून आदिवासी गाव-पाडय़ांततून तांदूळ, गहू, कपडे, मीठ स्वरूपात कोल्हापूर, सांगली पुरग्रस्ताना मदत केली आहे. त्यामुळे स्वकेंद्री जीवनपद्धतीत माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती येते, अशी प्रतिक्रिया प्रतीक पाटील यांनी दिली.

वीटभट्टीवरील मजुरांकडून मदत रवाना करण्यात आली.