धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. हेमंत पाटील यांनी धनगर समाजासाठी अनेक आंदोलनं केली असून यासाठी त्यांना जेलमध्येही जावं लागलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी म्हणून उच्च न्यायालयात त्यांनी याचिकाही केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत पाटील काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत आज हेमंत पाटील यांची यासंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

हेमंत पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास भाजपा आणि राष्ट्रवादीवर नाराज असलेला धनगर समाज काँग्रेसकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात 22 टक्के असणारा धनगर समाज हेमंत पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसचं पारं जड होईल अशी चर्चा सुरु आहे.