20 September 2020

News Flash

अंजली दमानियांविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याचे उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश

या संदर्भात अंजली दमानिया आणि इतरांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. 

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया व माजी मंत्री एकनाथ खडसे

औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले.

या संदर्भात अंजली दमानिया आणि इतरांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.  श्रीमती दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे कुटुंबीयांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका ४६/ २०१६ दाखल केलेली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी  खडसे यांचे चोपडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील ९ कोटी ५० लाख व १० लाख असे दोन डीडी जोडलेले आहेत. या संदर्भात नोटीस प्राप्त झाल्यावर  खडसे यांनी, चौकशी केली असता हे डीडी खोटे असून, बनावट दस्तऐवज आधारे तयार करण्यात आलेले आहेत. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे करण्यात आले.

हे बनावट डीडी आणि त्या संदर्भातील खोटा दस्तऐवज खरे असल्याचे भासवून खंडपीठात दाखल याचिकेमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला. हे डीडी आरोपींनी कसे मिळविले, त्यांच्याकडे कसे आले याच्या तपासासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 7:43 am

Web Title: high court order to cancel fir against anjali damani
Next Stories
1 मोदी सध्या तुम्हीच सत्तेवर आहात हे कसे विसरता? – उद्धव ठाकरे
2 पुन्हा अवकाळी पाऊस
3 २० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या
Just Now!
X