02 March 2021

News Flash

“भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा”; उदय सामंत यांचं केंद्राला आवाहन

उदय सामंत यांनी केलं ट्विट

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत. (संग्रहित छायाचित्र)

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा निर्णय अजूनही निकाली लागलेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगानं सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका मांडली जात आहे. याच भूमिकेवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोर दिला आहे. केरळमधील घटनेचा संदर्भ देत “केंद्र सरकारनं भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,” असं आवाहन सामंत यांनी केलं आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. केरळमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहीजणांना करोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताचा हवाला देत सामंत यांनी हे ट्विट केलं आहे. “आता केंद्र सरकार अजून कसली वाट बघत आहे. कर्नाटक (परीक्षा केरळ सरकारनं घेतली आहे. ट्विटमध्ये चुकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.) सरकारनं घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली असं पुढे आले आहे. केंद्र सरकारनं भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,” असं आवाहन सामंत यांनी परीक्षासंदर्भात केंद्राकडे केले आहे.

केरळ सरकारच्या वतीनं अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्याचबरोबर केरळ सरकारनं जवळपास परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर सोशल डिस्टन्सिग नियमाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.

राज्यातील परिस्थिती गंभीर…

करोनामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. बुधवारी (२२ जुलै) राज्यात आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. राज्यात एका दिवसातच तब्बल दहा हजार ५७६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे १२ हजार ५५६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 11:17 am

Web Title: higher education minister uday samant appeals centre to cancel university exam bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …म्हणून राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली २० लाख पत्रं पाठवणार
2 साताऱ्यात कडक लॉकडाउननंतरही करोनाच्या संसर्गात वाढ
3 सोलापूर : बारचालक मृत्यूप्रकरणी पाच सावकारांसह शिवसेना नगरसेवकाला अटक
Just Now!
X