04 August 2020

News Flash

धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी हिलाल माळी

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी हिलाल माळी आणि राजेंद्र पाटील यांची, तर महानगर प्रमुखपदी नगरसेवक सतीश महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

| December 29, 2014 01:37 am

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी हिलाल माळी आणि राजेंद्र पाटील यांची, तर महानगर प्रमुखपदी नगरसेवक सतीश महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांपासून पक्षात निर्माण झालेली मरगळ, गटबाजी आणि सुरू असलेली पराभवाची मालिका यातून पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान या नवीन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यावर शिवसेनेने संघटनात्मक फेररचनेला गती दिली असून, धुळ्यात मोठय़ा प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिल्हाप्रमुखपदी दोन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. त्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि साक्री या तीन मतदारसंघांसाठी हिलाल माळी यांची, तर शिरपूर आणि शिंदखेडा या तालुक्याची जबाबदारी माजी नगरसेवक तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक सतीश महाले यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2014 1:37 am

Web Title: hilal mali dhule district shiv sena president
Next Stories
1 रखडलेल्या पाणीपुरवठा योजना; ४४ लाखांचे अंदाजपत्रक
2 राष्ट्रवादीत निष्ठावंत ‘निवेदनयुद्ध’ सोनवणे-मुंदडा यांच्यात रंगला वाद
3 केळकर समितीने पश्चिम महाराष्ट्राचे हित पाहिले
Just Now!
X