“माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा,” अशी मागणी हिंगणघाट येथील जळीतकांडामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीच्या वडिलांनी केली आहे.
वर्ध्यामधील हिंगणघाट येथे जळीतकांडामध्ये गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेची प्राणज्योत मालावली. ‘आरोपीला आमच्या स्वाधीन करण्यात यावं’, अशी मागणी मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केली आहे. तसेच ‘माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा,’ अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हिंगणघाट येथे ३ फेब्रवारी रोजी एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली पिडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी विकेश नगराळे दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणी ४० टक्क्यांहून अधिक भाजली. या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

“माझ्या मुलीला जसा त्रास झाला तसा त्रास आरोपीला झाला पाहिजे,” अशी भावना मुलीच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. “त्याला जिवंत जाळलं पाहिजे. त्याला जनतेसमोर आणलं पाहिजे. इतकचं मी यावेळी सांगू शकतो,” असंही पडितेच्या वडिलांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात बोलताना, “लवकरात लवकर या खटल्याचा निर्णय लावा, नाहीतर आरोपीला आमच्या स्वाधीन करा,” अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

कोण आहे आरोपी?

आरोपीचे नाव विकेश नगराळे असं आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते. घटनेनंतर सहा तासांनी आरोपी नगराळे यास टाकळघाट येथून अटक करण्यात आली होती. सध्या आरोपीला न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.