News Flash

VIDEO: ‘अहिंसा परमो धर्म:’ वगैरे ते गेलं सर्व खड्ड्यात…” मनसेने करुन दिली प्रबोधनकारांच्या विचारांची आठवण

प्रबोधनकार ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाचा व्हिडीओ मनसेकडून टि्वट करण्यात आला आहे.

स्त्रीची कोणी टिंगल करत असेल, तर तिचा सन्मान राखण्यासाठी कशी भूमिका घेतली पाहिजे, या संदर्भात प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा जुना व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टि्वट केला आहे. आज हिंगणघाट पीडितेचा मृत्यू झाला. आवडयाभरापासून तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. या पार्श्वभूमीवर प्रबोधनकार ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाचा व्हिडीओ टि्वट करण्यात आला आहे.

“महिलांबद्दल जितका आदर तुम्ही अंत:करणामध्ये साठवित जाल, तितका तो शिवराया तुमच्यावर फार प्रसन्न होईल! महिलेशी कुणी गैरवर्तन केलं तर एक फाऽडकन भडकावली पाहीजे. ‘अहिंसा परमो धर्म:’ वगैरे ते गेलं सर्व खड्ड्यात…” ही प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यावेळी भूमिका मांडली होती. ३० ऑक्टोंबर १९६६ सालचं प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषणाच ऑडिओ रेकॉर्डिंग मनसेकडून टि्वट करण्यात आलं आहे.

राज्यात महिला अत्याचाराच्या बातम्या पाहून फक्त हळहळ व्यक्त करून चालणार नाही. जिथे नराधमांकडून अन्याय-अत्याचार दिसतील तिथे कशाचीही तमा न बाळगता प्रतिकारासाठी धावून गेलंच पाहिजे! असे मनसेने म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 5:39 pm

Web Title: hinganghat lecturer dies mns tweet prabodhankar old speech dmp 82
Next Stories
1 हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
2 मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई, वडील आणि भावाची आत्महत्या
3 हिंगणघाट जळीतकांड : रेणुका शहाणेंनी व्यक्त केला संताप
Just Now!
X