News Flash

‘…तोपर्यंत मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही’; पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया

हिंगणघाट येथील जळीतकांडामधील तरुणीचा मृत्यू

पीडितेच्या वडिलांची भूमिका

माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तिचं पार्थिव स्वीकारणार नाही, अशी भूमिका हिंगणघाट येथील जळीतकांडामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीच्या वडिलांनी घेतली होती. मात्र नंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे. “आरोपी मुलाला पेटवल्याशिवाय मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही,” अशी उदविग्न प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. ३ फेब्रुवारी रोजी एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे या तरुणाने प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी सुरु असणारी झुंज आज सकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात या तरुणीने अखेरचा श्वास घेतला.

आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिला न्याय मिळेपर्यंत आपण पार्थिव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली होती. “तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असं वाटतं होतं. डॉक्टरांनीही एक दीड महिन्यात तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असं आम्हाला सांगितलं होतं. मात्र आज तिचा मृत्यू झाला अन् माझ्यावर आभाळ कोसळलं. आजच्या या वृत्तानंतर मला मानसिक धक्का बसाला आहे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा. त्याला माझ्या डोळ्यासमोर जिवंत जाळल्याशिवाय माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही”, असं मत पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे.

पीडितेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. दुपारनंतर पीडितेच्या मूळ गावी म्हणजेच दारोडा येथे अत्यंविधी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र “जोपर्यंत पीडितेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पार्थिव ताब्यात घेणार नाही. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जोपर्यंत शासनाकडून दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाही. न्याय दिला जात नाही तोपर्यंत पार्थिव स्वीकारणार नाही,” असं पीडितेच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर मात्र चर्चेनंतर मृतदेह स्वीकारणार असल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पीडितेच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार असल्याने गावातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 9:14 am

Web Title: hinganghat we will not accept the dead body says victims father scsg 91
Next Stories
1 हिंगणघाट जळीतकांड : दोन वेळा हृदय बंद पडलं, रक्तदाबही खालावला अन्
2 “माझ्यासमोर आरोपीला जिवंत जाळा”; पीडितेच्या वडिलांची मागणी
3 पाली-खोपोली मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, दोनजण जखमी
Just Now!
X