वर्ध्यामधील हिंगणघाट येथे जळीतकांडामध्ये गंभीर जखमी झालेल्या पिडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. तरुणीच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिच्या वडिलांनी आरोपीला आमच्या स्वाधीन करावे अशी मागणी केली आहे. या पीडितेच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मूळ गावी म्हणजेच दारोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र या तरुणीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन संताप व्यक्त करण्याबरोबर या तरुणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हिंगणघाट येथे ३ फेब्रवारी रोजी एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली पिडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी विकेश नगराळे दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणी ४० टक्क्यांहून अधिक भाजली होती. या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर कोणी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात…

सुप्रिया सुळे

जयंत पाटील

चारुलता ठोसर

रामदास तडस

यशोमती ठाकूर

प्रवीण अलई

शितल म्हात्रे

या प्रकरणाची सुनावणी सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायलयामध्ये होऊन जलदगतीनं हा खटला चालवण्यात यावा. या प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सोशल मिडियावरुन होताना दिसत आहे.