|| तुकाराम झाडे

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

विभागात पहिल्या क्रमांकावरील जिल्ह्य़ाच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह

हिंगोली : घरकुल योजनेच्या कामांत विभागात प्रथम क्रमांकावर हिंगोली जिल्हा आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत हिंगोलीत ५ हजार ७६६ पकी ३ हजार ७९० कामे पूर्ण झाले. उर्वरित एक हजार ९७६ व आठ महिन्यांपूर्वी नव्याने मंजूर १ हजार घरकुलासाठी निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. निधीचा अडसर दूर न झाल्यास कामाच्या उद्दिष्टपूर्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात रमाई आवास योजने अंतर्गत ३ लाख ३५ हजार ७३३ मंजूर घरकुले असून त्यापकी एक लाख ५५ हजार १६३ घरकुलांचे काम पूर्ण झाले. तर एक लाख ८० हजार ५७० कामे निधीअभावी अपूर्ण आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यत ५ हजार ७६६ घरकुले मंजूर झाली. मंजूर घरकुलांपकी ३ हजार ७९० घरकुलाचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित १ हजार ९७६ तसेच, नव्याने मंजूर झालेले अतिरिक्त एक हजार घरकुलांचे काम निधीअभावी रखडले आहे.

हिंगोली जिल्ह्यत प्रधानमंत्री घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राज्य पुरस्कृत रमाबाई आवास योजना (ग्रामीण), या घरकुलांच्या कामांमध्ये जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु १५ जानेवारी २०२० पासून लाभार्थ्यांना कुठलाच हप्ता सोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे घरकुलाची कामे रखडली आहेत. एकूण लाभार्थ्यांपकी पहिला हप्ता ४ हजार ९२२, दुसरा हप्ता ४ हजार १६७, तिसरा ३ हजार ५९३, चौथा १ हजार ६९० रुपयांचा हप्ता काही लाभार्थ्यांना भेटलेला आहे. मात्र हल्ली सामाजिक न्याय विभागात निधीचा तुटवडा असल्याने घरकुलांची कामे रखडल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

रमाई आवास योजनेमध्ये घरकुल मंजूर झाले. पंधरा हजाराचा पहिला धनादेश मिळाला. घरकुलाचे काम पायाभरणीच्या स्तरापर्यंत आले. शेजाऱ्याच्या मोकळ्या जागेत टिन पत्र्यांची उभारणी करून निवाऱ्याची सोय केली. मात्र, घरकुलाचे पुढील काम निधीअभावी रखडले. निधी येईल आणि काम सुरू होईल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र दोन महिन्यांपासून निधीच्या प्रतीक्षेतच आहोत.

– कैलास पांडुरंग कांबळे, लाभार्थी, आडगाव मुटकुळे.

घरकुलासाठी लाभार्थ्यांना एक लाख २० हजारांचा निधी मिळतो. एवढय़ा रकमेत घरकुलाचे काम पूर्ण होत नाही. लाभार्थ्यांला पदरमोड करून स्वतची काही रक्कम समाविष्ट करावी लागते. निधीअभावी रखडलेल्या कामामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. शासनाने निधी द्यावा.

– खंडेराव सरनाईक, स्थानिक कार्यकर्ते, केंद्रा बुद्रुक.