News Flash

हिंगोलीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

पूजा दळवी ही पुणे येथील होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे पूजा काही दिवसापूर्वी कुरुंदा येथे आली होती असे पोलिसांनी सांगितले.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोनाजी दळवी यांचे घर आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये एकाच कुटूंबातील तीन जणांचा भाजून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे कुरुंदा परिसरावर शोककळा पसरली आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोनाजी दळवी यांचे घर आहे. गुरुवारी रात्री सोनाजी आनंदराव दळवी (वय ५५), त्यांची पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (वय ४५) व त्यांची मुलगी पूजा सोनाजी दळवी ( वय २५ ) हे घरात झोपले होते. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये घरातून आगीचा मोठा भडका उडाला. झोपेत असलेल्या दळवी कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका खूप मोठा असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. तोवर वसमत येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोवर दळवी कुटुंबातील तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. पूजा दळवी ही पुणे येथील होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे पूजा काही दिवसापूर्वी कुरुंदा येथे आली होती असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 12:07 pm

Web Title: hingoli 3 of a family killed in fire after cylinder blast in kurunda
Next Stories
1 ‘राजकीय नेतेच नक्षलवाद्यांना दारूगोळा पुरवतात’
2 पाच जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
3 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा अतिउत्साह शिपायांच्या जीवावर?
Just Now!
X