News Flash

शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दप्तर दिरंगाई भोवली, हिंगोलीचे तहसीलदार निलंबित

वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलानेही केली होती आत्महत्या

hingoli farmer suicide case, tehsildar, gajanan shinde, suspended,marathi news, marathi
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास दिलेले अनुदान मंजूर करण्यात दप्तर दिरंगाई करणाऱ्या हिंगोलीतील तहसीलदाराला निलंबित करण्यात आले आहे. गजानन शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. मुदत ठेवीच्या रुपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने संजय वामन शिंदे यांनी आत्महत्या केल्याची घटना १० नोव्हेंबरला घडली होती. या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतर्गत गजानन शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आंबाळा तांडा येथील संजय वामन जाधव याचे वडील वामन घाशिराम जाधव (वय ६५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून ऑगस्ट २०१५ मध्ये घरासमोरच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वामन जाधव यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांना ३१ हजार रोख व ६९ हजार रूपये मुद्दत ठेवीच्या स्वरूपात शासनाकडून देण्यात आले होते.

आई आजारी असल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचारासाठी रक्कम मिळावी, अशी मागणी संजयने केली होती. परंतु, तहसीलदार गजानन शिंदे, हिंगोली यांनी ३१ ऑक्टोंबर २०१७ ते ९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही. आईच्या उपचारासाठी रक्कम मिळत नसल्याने त्याने ९ नोव्हेंबरला विष प्राशन केले. यानंतर संजयला तात्काळ औषध उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १० नोव्हेंबर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ९ नोव्हेंबरला पत्र पाठवल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. पण शेतकर्‍याच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याऐवजी १० दिवस विलंब केला आहे, असा ठपका ठेवून गजानन शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2017 7:41 pm

Web Title: hingoli farmer suicide case tehsildar gajanan shinde suspended
Next Stories
1 मुख्यमंत्रीपद हे माझे स्वप्न नाही : उद्धव ठाकरे
2 कोपर्डी प्रकरणातील बचावपक्षाच्या वकिलांना अज्ञातांकडून धमकी
3 शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना उच्च न्यायालयाचा धक्का; आमदारकी रद्द
Just Now!
X