01 March 2021

News Flash

महाराष्ट्रातील करोना व्हायरसच्या तीन रुग्णांवर HIV प्रतिबंधक औषधांचा वापर

महाराष्ट्रात सध्या करोना व्हायरसचे एकूण ४२ रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात सध्या करोना व्हायरसचे एकूण ४२ रुग्ण आहेत. त्यातील तीन रुग्णांवर लोपिनावीर/रिटोनावीर या HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी दिली.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अर्चना पाटील यांनी ही माहिती दिली. करोनाग्रस्त रुग्णांवर HIV प्रतिबंधक औषधे वापरणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अर्चना पाटील यांनी ही माहिती दिली.

HIV प्रतिबंधक औषधांचा सरसकट वापर करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार ही औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे अशी माहिती पाटील यांनी दिली. राजस्थानात इटलीहून आलेल्या एका जोडप्यावर HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्यात आला होता. या जोडप्याचे करोना व्हायरसच्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. म्हणजे हे जोडपे करोना व्हायरस मुक्त झाले आहे. वयाची पासष्टी ओलांडलेले हे जोडपे राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता.

आरोग्य मंत्रालयाने काय सल्ला दिलाय ?
COVID – 19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनासंदर्भात सुधारित मार्गदर्शकतत्वे मंगळवारी जारी करण्यात आली. त्यानुसार वयाची साठी ओलांडलेल्या डायबिटीस, मूत्रपिंडाचा विकार आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

एम्सचे डॉक्टर, एनसीडीसी आणि WHO या तज्ञांच्या समितीने उपचारांच्या मार्गदर्शकतत्वांचा फेरआढावा घेतला व करोना बाधितांना सहाय्यक ठरतील अशी नवीन उपचार पद्धती अंमलात आणण्याचा सल्ला दिला अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी राजस्थानात उपचार घेणाऱ्या इटालियन जोडप्याची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. “करोना व्हायरसच्या रुग्णांवर एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी आयसीएमआरने परवानगी घेतली आहे. इमर्जन्सीमध्ये लोपिनावीर/रिटोनावीर औषधांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.” अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 7:15 pm

Web Title: hiv drug used in maharashtra on three corona patient dmp 82
Next Stories
1 Coronavirus: राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी विचारले “महाराष्ट्रात आणखीन काय करणं बाकीय सांगा?”; हर्ष वर्धन म्हणाले…
2 … तरच होणार करोनाची चाचणी, आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
3 “करोना थांबवण्यासाठी मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक थांबवावीच लागेल”
Just Now!
X