News Flash

राज्यातील शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर!

१४ जून पासून नवीन शैक्षिणक वर्ष सुरू होणार

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून, १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शाळेतून सुट्टी मिळाली आहे.  तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता. २८ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील शिक्षक संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी आज यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्याबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.

यानुसार १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 7:14 pm

Web Title: holidays announced for schools in the state from may 1 msr 87
Next Stories
1 Corona Crisis : “केंद्राप्रमाणे राज्याने देखील व्यवस्था उभी करावी, वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही”
2 “…लसच उपलब्ध नाही तर लसीकरण होणार कसं? मोदी सरकारला उत्तर द्यावं लागेल”
3 काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा
Just Now!
X