भेटी नाही झाली तर गाठी बसणे गरजेचे असते म्हणतात. हॉलंडच्या मिका जाधव यांना भेट दिल्यावर याचाच प्रत्यय येतो. सामाजिक संस्थेच्या मदतीने कुष्ठरोगी महिलेच्या उपचारासाठी आणि घरबांधणीसाठी मदत करणाऱ्या मिका रुक्मिणी नामक त्या महिलेचा शोध घेण्यासाठी चक्क रायगड जिल्ह्यातील पोलादपुर मध्ये दाखल झाल्या आहेत. गावागावात जाऊन रुक्मिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.
हॉलंडची मिका जाधव सध्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर गावात दाखल झाली आहे. सध्या रूक्मीणी नावाच्या महिलेचा शोध ती घेतेय. ही रूक्मीसणी पोलादपूरच्या. दि लेप्रसी मिशन हॉस्पीटलमध्ये  उपचार घेत होती. मिकाने केलेल्याच मदतीतून रूक्मी णीवर उपचार करण्यायत आले तिला घर देखील बांधून देण्यात आले होते. यासाठी संबधित सामाजिक संस्थेनी रूक्मीणीचा फोटो मिकाला पाठवण्याहत आला होता. तो फोटो पाहिल्यापासून मिकाचे तिच्याशी भावनिक नाते जडले. मानसोपचार तज्ञ असणाऱ्या मिका हिचे तेव्हा पासून रुक्मिणीच्या हसतमुख चेहरयाशी भावनिक संबध जोडले गेले होते. आता तिच्याह भेटीसाठी आतुर झालेली मिका हजारो किलोमीटरचा प्रवास करून पोलादपूरात आलीय .
मागील आठवडाभरापासून रूक्मीणीच्या. शोधासाठी मिका गावोगाव भटकतेय . तिची नजर काहीतरी शोधतेय हे पोलादपूरातील काही तरूणांनी ओळखलं . त्यांननी तिची चौकशी करून रूक्मीकणीच्याख शोधासाठी ते तिला मदत करताहेत . केवळ एक फोटो आणि फक्त रूक्मिणी एवढेच नांव माहिती असल्याने अद्याप रूक्मीणीचा शोध लागू शकला नाही.
रूक्मीणी ज्या लेप्रसी मिशन रूग्णायलयात उपचार घेत होती ते रूग्णालय 2010 सालीच बंद झालंय. तिथं कोणतीच कागदपत्र उपलब्धय नसल्यानं रूक्मीकणीचा शोध घेणं अवघड होवून बसलंय.
३१ मे रोजी मिकाचा वाढदिवस आहे तो दिवस रूक्मीणीबरोबर घालवायची मिकाची मनोमन इच्छा आहे . जर रूक्मी्णीबद्दल कुणाकडे माहिती असल्या स त्यांनी 8087040991 किंवा 9226849185 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन तीने केले आहे.