पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशनने राज्यातील सर्व पेट्रोल पंप अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आज रात्री ७ ते ७.३० या काळात सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कन्सोर्टिअम ऑफ इंडिअन पेट्रोलिअम डिलर्सने (सीआयपीडी) सदस्यांना आपले पेट्रोल पंप आणि इंधन स्टेशन्स वीस मिनिटांसाठी बंद ठेवण्याच्या सुचन्या दिल्या आहेत.

सीआयपीडीचे राज्यातील सचिव रवि शिंदे म्हणाले, संघटनेच्या निर्णयानुसार, आज (दि.२०) राज्यातील सर्व पेट्रोल पंप रात्री ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात पेट्रोल-डिझेल तसेच इतर कोणत्याही इंधनाची विक्री केली जाणार नाही. या काळात सर्व पेट्रोल पंपांवरील दिवेही मालवले जातील.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी एक आत्मघातील हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर देशभरात जनतेने विविध माध्यमांतून आपल्यी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजलीही वाहण्यात आल्या.