News Flash

डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे होम-हवन

डॉ. चांदेकर यांचा कु लगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ मे रोजी पूर्ण झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना विद्यार्थी.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कु लगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या निषेधार्थ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक होम-हवन आयोजित करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न के ला. डॉ. चांदेकर यांच्यामुळे विद्यापीठाला लागलेल्या ग्रहणातून आम्ही मुक्त झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले, अशी प्रतिक्रि या विद्यार्थ्यांनी व्यक्त के ली. यावेळी गरजूंना धान्य व कपडे वाटप देखील करण्यात आले. माजी सिनेट सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

डॉ. चांदेकर यांचा कु लगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ मे रोजी पूर्ण झाला. डॉ. चांदेकर यानी विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून सामान्य विद्यार्थ्यांना फसवण्याचे काम केले. विद्यापीठात जमा होणारा सामान्य विद्यार्थ्यांचा पैसा अपात्र कंपन्याच्या घशात ओतून विद्यापीठाचे मोठे आर्थिक नुकसान केले. विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयक, प्रशिक्षण, नोकरीविषयक तसेच विकासाच्या अनेक योजनांना नख लावण्याचे काम के ले, असा आरोप संघर्ष समितीने के ला. अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रतीकात्मकरित्या होम हवन व शुद्धीकरण करून तसेच विद्यापीठाच्या विविध विभागात गोमूत्र शिंपडून संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारातील संत गाडगेबाबांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ. चांदेकर यांना त्यांनी केलेल्या गैवरव्यवहाराची कबुली देण्यासाठीचे बळ व सद्बुद्धी संत गाडगेबाबांनी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली. नवीन कु लगुरूंनी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे व विद्यापीठातील अनेक पुढे आलेल्या गैवरव्यवहारांची शहानिशा करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संघर्ष समितीने के ली. यावेळी प्रथमेश पिंपळे, अजिंक्य मेटकर, अखिल ठाकरे, तुषार कोंबे, भूषण कोलपकर, गोविंद यादव, अमन सोनी आदी विद्यार्थी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 3:12 am

Web Title: home burning students protest murlidhar chandekar ssh 93
Next Stories
1 ठोक किराणा,भुसार मालाच्या विक्रीस सकाळी ७ ते ११ परवानगी
2 पारनेरमधील अवैध व्यवसायांसह वाळू तस्करांवर कारवाई करा – राजे
3 मराठा आरक्षणाचा लढा हा सर्व पातळीवर लढणार – आ. राधाकृष्ण विखे
Just Now!
X