News Flash

जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला बेदम मारहाण, मुलीची कॉलर पकडून फरफटत नेलं; कारवाईचे आदेश

जालन्यात एका प्रेमी युगुलाला मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

जालना तालुक्यातील गोंदेगावनजीकच्या तळ्याकाठी प्रेमीयुगुलाला स्थानिक चार तरुणांनी मारहाण केल्याची घटना २९ जानेवारी घडली. ही घटना ३१ जानेवारी एका चित्रफितीव्दारे उघडकीस आली. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे. जालना पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी काही पथके तयार केल्यानंतर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून इतर तीन जणांची नावे उघडकीस आले आहेत. आरोपी अल्पवयीन आहेत की सज्ञान हे अद्याप उघड झालेलं नाही. प्रेमीयुगुलापैकी तरुणी ही विदर्भातील दिग्रस येथील आहे. तर तिचा मित्र हा बुलडाणा जिल्हयातील सावखेडा गावचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

अनिल देशमुख यांनी घटनेवर ट्विट करत सांगितलं आहे की, “जालन्यात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे याचा व्हिडिओ व्हायरल होत होता त्याला थांबवण्याचे आदेश दिले गेलेले आहे. तसेच आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणार”.

व्हायरल व्हिडीओत काहीजण मिळून दोघांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर टोळक्यातील तरुण तरुणीला कॉलर पकडून फरफटत नेत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे दोघं वारंवार विनंती करत असूनही त्यांना मारहाण केली जात आहे. तरुण आम्ही चुकीचं काही केलं नाही. इथे तळं होतं म्हणून आलो. दादा प्लीज, यानंतर नाही होणार असं सांगत गयावया करताना दिसत आहे. टोळक्यातील तरुण मात्र कोणतीही दया दाखवत नाहीत. उलट तरुणीच्या वडिलांना बोलाव असं सांगत आहेत. तरुण त्यांच्यासमोर रडू लागल्यानंतर रडू नको आम्ही माजलेली डुकरं आहोत असंही ते सांगताना दिसत आहेत. पोलिसांनी कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:11 pm

Web Title: home minister anil deshmukh on viral video of couple attacked in jalna sgy 87
Next Stories
1 चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरुप, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
2 … हा तर सकाळी लवकर शपथ घेतो; अजित पवारांची तुफान फटकेबाजी
3 औरंगाबादमध्ये क्रूझरची ट्रेलरला धडक, भीषण अपघात चार भाविकांचा जागीच मृत्यू
Just Now!
X