News Flash

रमझान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्याची केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केंद्राकडे ही मागणी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. राज्यात पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत काही पोलीस कर्मचाऱ्यांचे करोना अहवाल पॉझिटिल्ह आल्याची माहिती समोर आली होती. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. येत्या २५ मे रोजी रमझान ईदही असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २० कंपन्यांची म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

आणखी वाचा- पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्र सरकारने मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे – उद्धव ठाकरे

“राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे ३२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमाझान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय शसस्त्र दलाचे २००० पोलीस कर्मचारी म्हणजेच २० कंपन्या पाठवाव्यात,” अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

आणखी वाचा- मुंबईत लष्कर बोलवणार? पोलीस सांगतात अफवा पसरवू नका!

राज्यातील ८१९ पोलिसांना करोनाची लागण

महाराष्ट्रात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर सात पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:11 pm

Web Title: home minister maharashtra asked center for 20 companies of crpf eid coronavris lockdown jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पर्याप्त वाटतंय – पृथ्वीराज चव्हाण
2 राहुल गांधींचं सुद्धा राज्यातील सरकार ऐकत नाही?; मोदींना सूचना करणाऱ्या अशोक चव्हाणांना भाजपाचा सवाल
3 लॉकडाउनमध्ये चोरवाटेने नदीतून जाणारे दोघे बुडाले; मृतांत एका प्राध्यापकाचा समावेश
Just Now!
X