News Flash

वारकऱ्यांच्या वेशात विठुरायाचे दर्शन; गृहमंत्र्यांनी घातलं साकडं

महाराष्ट्र लवकर करोनामुक्त होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

आषाढी एकादशीची वारी व करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट दिली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारकऱ्यांच्या वेषात पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले. महाव्दार चौकातून गृहमंत्र्यांनी विठूरायाचे दर्शन घेतले. दर्शन घेतेवेळी गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला साकडं घातलं. “विठू माउली तू माऊली जगाची… आर्त साद तुज ही करोना मुक्तीची” असं म्हणत त्यांना राज्य करोनामुक्त होण्यासाठी विठूरायाकडे प्रार्थना केली. संपूर्ण जग, भारत आणि महाराष्ट्रातून या करोनाला घालवा व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या”, असं साकडं विठूरायाच्या चरणी गृहमंत्री देशमुखांनी घातलं.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा कायम राहावी, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख वारकऱ्यांच्या वेषात होते. गळ्यात तुळशीचा हार व हातात वीणा घेऊन त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री मामा भरणे, आमदार भारत भालके उपस्थित होते.

पांडुरंगाच्या दर्शनानंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले. पालखी सोहळ्याबाबत शासन स्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचाच असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 6:57 pm

Web Title: home minister of maharashtra anil deshmukh visit pandharpur lord vitthal mandir pray for corona free state vjb 91
टॅग : Ashadhi Ekadashi,Wari
Next Stories
1 पुन्हा लॉकडाउन; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १ ते ८ जुलै या काळात लागू होणार कडक निर्बंध
2 सासरी आलेला जावई करोनाबाधित निघाल्याने गावात खळबळ; संपर्कात आलेले झाले क्वारंटाइन
3 “…म्हणून मोदींनी कंटाळवाण्या ‘मन की बात’मध्ये चीनविरुद्ध शब्दही काढला नाही”
Just Now!
X