१५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. १५ मे २०२० ते ५ जून २०२० या काळात ९ लाख ४७ हजार ८५९  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात ५९ हजार ४९८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात ३४ हजार ०४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७,२६१ अनुज्ञप्ती सुरू  आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाउन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मेपासून  घरपोच मद्यविक्री योजना अमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याचीसुविधा उपलब्ध आहे.

१ मे २०२० ते ३१ मे २०२० या काळात १ लाख २० हजार ५४७ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख १० हजार ७६३ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाइन मद्यसेवन परवाना घेतांना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाइन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु. १,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

२४ मार्च, २०२० पासून राज्यात लॉकडाउन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करीरोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनीनाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.५ जून २०२० रोजी राज्यात ७७ गुन्हे नोंदविण्यात आलेअसून ४३ आरोपींना अटक करण्यात आली असून ९ लाख ६० हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२४ मार्च, २०२० पासून ५ जून २०२० पर्यंत लॉकडाउन काळात राज्यात एकूण ७ हजार २२५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३ हजार ३४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ६६२ वाहने जप्त करण्यात आली असून १८ कोटी ६७ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com  ई-मेल आहे.