News Flash

सहा घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

रविवारी रात्रीपासूनच वादळवारा सुटल्याने विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली.

डहाणू : ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे डहाणू, पालघर तालुक्यांतील सहा घरांचे नुकसान झाले. डहाणू तालुक्यातील एका घराचे मोठे तर तीन घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. आष्टे, वांगणपाडा येथील लाश्या थोरात यांच्या घराचे वादळ व अतिवृष्टीमुळे संपूर्ण पत्रे उडून संसार उघड्यावर आला आहे. डहाणू कंक्राटी जुन्नरपाडा येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघरमध्ये दोन घरांचे नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यात केळवे, सफाळे परिसरांत घरांचे नुकसान झाले.

रविवारी रात्रीपासूनच वादळवारा सुटल्याने विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. तर सकाळपासून पावसाने संततधार सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळवारा सुटताच घराचे पत्रे उडण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागांत मोठमोठाली झाडे एका बाजूला झुकलेली पाहायला मिळाली. किनारपट्टीच्या भागात फारसे नुकसान झाले नसले तरी ग्रामीण भागात मात्र या वादळामुळे नुकसान झालेले पाहायला मिळाले. सर्वच ठिकाणी घरांचे कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:40 am

Web Title: home slap flood heavy rain in palghar akp 94
Next Stories
1 करोनाकाळात लग्नसमारंभात हाणामारी
2 रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कोटय़वधींची हानी
3 Coronavirus : राज्यात दिवसभरात ४८ हजार २११ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९०.१९ टक्के!
Just Now!
X