25 January 2021

News Flash

नागपूर हादरलं! प्रियकराने प्रेयसीला भर चौकात जिवंत जाळले

अंजुमन महाविद्यालयासमोरील भयंकर घटना

(संग्रहित छायाचित्र)

प्रेमीयुगुलात टोकाचा वाद होऊन प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे. ही भयंकर घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आगीत होरपळलेल्या प्रेयसीनं उपचारादरम्यान प्राण सोडले.

शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. बघता बघता त्यांच्यातील वाद टोकाला गेला. संतापलेल्या प्रियकराने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. त्यानंतर शबाना यांना पेटवून देत प्रियकर घटनास्थळावरून पसार झाला.

प्रियकर दुचाकीवर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघून घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

सासऱ्याकडून विवाहितेच्या खूनाचा प्रयत्न

प्रियकराने प्रेयसीला जाळल्याच्या घटनेबरोबरच शहरात विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. लग्नात महागड्या वस्तू न मिळाल्याने सासऱ्याने नातेवाईकांच्या मदतीने २६ विवाहितेला चौथ्या मजल्यावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. न्यू नरसाळा मार्गावरील शारदा कॉम्प्लेक्स येथे २३ डिसेंबरला घडली. करिश्मा साकेत तामगाडगे असं जखमी विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती साकेत भीमराव तामगाडगे, सासरे भीमराव तामगाडगे, सासू ललिता, नणंद प्राची राहुल वासनिक व प्राची यांचे पती राहुल या पाच जणाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 9:16 am

Web Title: horrible women set ablaze by husband in nagpur bmh 90
Next Stories
1 हॉटेल थांब्यावर एसटी १५ मिनिटांहून अधिक थांबल्यास कारवाई
2 संघ विचाराला ‘मार्केटिंग’ची गरज – गडकरी
3 शेतकरी आंदोलनामुळे विदर्भातील व्यापाऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान
Just Now!
X