सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील कस्तुरबा कन्या छात्रालय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीचा रविवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण कळू न शकल्याने या घटनेविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या वसतिगृहातील दामिनी हिरामण गावित (१५) या पाचवीतील विद्यार्थिनीला रविवारी सकाळी उलटय़ा झाल्याचे इतर विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या महिला अधीक्षकांना कळविले. रात्री जेवणानंतर दामिनी पोटात दुखत असल्याचे म्हणत होती. महिला अधीक्षकांनी मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक मोहन पवार यांना यासंदर्भात कळविल्यानंतर दामिनीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत कोणतीच सुधारणा न झाल्याने तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजता हलविण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील दोडीपाडा हे दामिनीचे गाव असून तिच्या पालकांना मृत्यूविषयी कळविण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 2:30 am