04 July 2020

News Flash

वादळाच्या तडाख्याने मंडणगडमध्ये घरे भुईसपाट

काही गावांत छपरांची घरे भुईसपाट झाली आहेत.

संग्रहित छायाचित्र

मंडणगड तालुक्यात खाडी पट्टय़ातील गावांना ‘निसर्ग’ वादळाने मोठा तडाखा दिला. यात काही गावांतील घरे वारा आणि पावसाच्या माऱ्याने भुईसपाट झाली आहेत.

काही गावांत छपरांची घरे भुईसपाट झाली आहेत. तर काही ठिकाणी सीमेंटच्या पत्र्याची छपरे उडून गेली आहेत. किंजळघर, आंबवणे बुद्रुक, शिगवण ,आंबडवे, घोसाळे पनदेरी, उंबरशेत,पेवेकोंड, वेळास, बाणकोट आणि वाल्मीकीनगरातील घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सावित्री नदीकाठी असलेल्या आंबवणे गावाचा इतर परिसराशी असलेला संपर्क पूर्णत: तुटला आहे.

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काही घरांतील धान्याची पोती भिजली आहेत. तर काही गावांतील मातीची घरे वाहून गेली आहेत. काही गावांतील रस्ते वाहून गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 12:24 am

Web Title: houses flattened in mandangad due to storm abn 97
Next Stories
1 अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना
2 रत्नागिरी जिल्ह्यात २७ हजार घरांचे नुकसान
3 वादळाच्या माऱ्याने संपूर्ण गावच कोसळले
Just Now!
X