News Flash

विरारमध्ये गृहिणीची हत्या

विरार पश्चिमेला एका सोसायटीमध्ये सायंकाळी गृहिणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

विरार : विरार पश्चिमेला एका सोसायटीमध्ये सायंकाळी गृहिणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विरार पश्चिम येथील ग्रीष्म सोसायटीत तळ मजल्यावर मनोहर डोंबळ त्यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांची पुतणी निशासह राहतात. मनोहर मुंबईतील एका हॉटेलमधून निवृत्त झाल्यानंतर विरारमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. तर त्यांची पत्नी मनीषा (६३) गृहिणी होत्या. तर निशा महाविद्यालयीन शिक्षण घेते. शुक्रवारी मनोहर कामावर गेले होते आणि निशा महाविद्यालयात गेली होती. सायंकाळी चारच्या दरम्यान मनीषा घरात असताना कुणी अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश करून मनीषा यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराने घरात चोरी केल्याचेही उघडकीस आले आहे.

मनोहर आणि निशा संध्याकाळी घरी आले असता घर उघडल्यावर सारा प्रकार उघडकीस आला. मनीषा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी विरार ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. हत्येचे नेमके कारण समजलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:37 am

Web Title: housewife murder in virar zws 70
Next Stories
1 महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी
2 उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन
3 महाड प्राचार्यपदावरू न हाणामारी प्रकरणी चौघांना पोलीस कोठडी
Just Now!
X