लहान मुलांना होणारा करोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्याभरातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे रविवार २३ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

लहान मुलांवर करोनाचं सावट; ‘झोपेतून जागे व्हा…’ काँग्रेस नेते राहुल गांधींचा सरकारला इशारा

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून, या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. डॉ. सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

हा कार्यक्रम २३ मे रोजी दुपारी १२ वाजेपपासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युट्यूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ येथे थेट पाहता येणार आहे.

यापूर्वी मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फॅमिली डॉक्टरर्सशी संवाद साधला होता. त्याच धर्तीवर उद्या राज्यातील बालरोग तज्ज्ञांसोबत संवाद साधणार आहेत.

पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये वाढतोय करोना…धक्कादायक आकडेवारी आली समोर

उत्तराखंडमध्ये गेल्या दीड महिन्यात १६ हजाराहून अधिक लहान मुलांना तसंच १९ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे. राज्याच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ९ वर्षे वयोगटातल्या ३ हजार २० मुलांना तर १० ते १९ वर्षे वयोगटातल्या १३ हजार ३९३ किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे.