News Flash

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप

किरकोळ कारणावरून पत्नीला पेटवून हत्या करणाऱ्या देवळा तालुक्यातील वासोळ येथील एकास येथील अप्पर सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. आई-वडिलांशी झालेल्या भांडणाच्या

| February 14, 2013 04:55 am

किरकोळ कारणावरून पत्नीला पेटवून हत्या करणाऱ्या देवळा तालुक्यातील वासोळ येथील एकास येथील अप्पर सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
आई-वडिलांशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून भाऊसाहेब दादाजी सूर्यवंशी याने २४ जुलै २००८ रोजी दारूच्या नशेत पत्नी सुनीता (२७) हिच्या अंगावर राहत्या घरी घासलेट टाकून पेटवून दिले. सुनीताने आरडाओरड केल्यानंतर शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी तिला सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ८० टक्के भाजलेल्या सुनीताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबाबात तिने पतीने पेटवून दिल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी हत्या व पत्नीस घरात डांबून ठेवल्याचा गुन्हा भाऊसाहेबविरुद्ध दाखल केला होता. सुनीता ही भाऊसाहेबची दुसरी पत्नी होती. त्याच्या छळास कंटाळून २००२ मध्ये पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला तीन वर्षे कारावास ठोठावला होता. मात्र या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात केलेल्या अपिलानंतर जामिनावर मुक्तता झाल्यावर त्याने दुसरे लग्न केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:55 am

Web Title: husbend punished with life imprisonment in wife murder matter
Next Stories
1 गिरणा धरणात बुडून तिघांचा मृत्यू
2 औरंगाबादला सभा घेण्यापासून मला जास्त वेळ अडविता येणार नाही: ओवैसी
3 स्वस्त पर्यायाच्या जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेविषयी सामान्य रुग्ण साशंक
Just Now!
X