पालघर, डहाणू तालुक्यात वर्षभरात २० टक्क्यांहूनही कमी काम

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

पालघर : खासदारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या पालघर तालुक्यातील तीन कामे आणि डहाणू तालुक्यातील एक काम समाविष्ट असलेल्या शासन आणि खासगी  भागधारकांतील (हायब्रीड अ‍ॅन्युइटी प्रोजेक्ट) रस्ते सुधारणा प्रकल्प संथ गतीने सुरू आहे.  गेल्या वर्षभरात या रस्त्यांचे २०  टक्क्य़ांहूनही कमी काम झालेले आहे. याशिवाय वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक रस्त्याचे कामही ठप्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प फोल ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या रस्त्यांवरून सुखकर प्रवासासाठी नागरिकांना २०२१ ची वाट पाहावी लागेल, अशी सध्या कामांची अवस्था आहे.

या प्रकल्पाअंतर्गत डहाणू तालुक्यातील चिंचणी-आशागड-उधवा अशा ३४.५० किलोमीटरचा रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे, पालघर तालुक्यातील परनाळी-बोईसर-पंचाली-उमरोळी-कोळगाव पालघर या १४.९० किलोमीटर रस्त्याची सुधारणा करणे, सफाळे-मांडे-टेंभीखोडावे असा ९.१० किलोमीटर रस्ता, तर नंडोरे-कल्लाळे-मान असा ९.२० किलोमीटरचा रस्ता बनविण्याचे नियोजन आहे. या चारही कामांच्या एकूण रस्त्यांची लांबी ६७.७० किलोमीटर इतकी आहे. यासाठी या प्रकल्पांतर्गत १९५.४४ कोटी रुपयांच्या निविदा रकमेला शासनाकडून मान्यता मिळाली आहे.

याचा कार्यादेश मे. जी. एच. व्ही. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गुजरात कंपनीला गेल्यावर्षी देण्यात आला. नियमानुसार हे काम दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. असे असताना या एकूण प्रकल्पापैकी १० टक्केच काम आजवर पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

ठेकेदारावर कोणताही प्रशासकीय यंत्रणेचा दबाव असल्याचे दिसून येत नाही. याउलट या कामाच्या देखरेखीसाठी ठाणे येथील टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला स्वतंत्र सल्लागार म्हणून नेमण्यात आले, मात्र ही सल्लागार संस्थाही या कामाच्या ठिकाणी हवे तसे काम करत असल्याचे काम झाल्याच्या टक्केवारीवरून तरी पाहावयास मिळत नाही.

प्रकल्पांतर्गत वारंवार खराब होणारे रस्ते, वाहतुकीला अडचण निर्माण करणारे रस्ते, रहदारीचे रस्ते अशी ठिकाणे लक्षात घेऊन प्रथमत: प्राधान्यRमाने ते ठेकेदाराने बनवणे अपेक्षित होते. मात्र तसे झाल्याचे दिसून येत नाही. याउलट पालघर तालुक्यातील चित्रालय, रूप रजत नगर, सरावली, पंचाळी व कोळगावस्थित रस्ता, मांडे, सफाळे, टेम्भीखोडावेतील काही भागांतील रस्त्याची अवस्था दयनीय आहे.

पालघर बोईसर रस्त्याचे काम अजूनही ठेकेदाराने केलेले नाही. हे काम परनाळीपासून सुरू केले गेलेले असले तरी त्या कामाला विलंब होत आहे.तर अशीच अवस्था सफाळे-टेंभिखोडावे रस्त्याची आहे.

ज्या ठिकाणी ठेकेदारामार्फत सद्यस्थितीत  सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना  ठकेदारामार्फत करण्यात आलेल्या नाहीत. या प्रकल्पांतर्गत चिंचणी-आशागड-उधवा आणि नंडोरे-मान-कल्लाळे अशा दोनच रस्त्याचे काम झाल्याचे मासिक प्रगती अहवालाच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. तर पालघर-बोईसर रस्ता आणि सफाळे-मांडे या रस्त्याचे काम अजूनही प्रगतिपथावर दाखविण्यात आलेले आहे. यामुळे ठेकेदाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पालघर-बोईसर रस्ता आणि सफाळे-मांडे रस्ता चे काम व्यवस्थित सुरू होत नसल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिक माहितीकरिता सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी किरनाळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.दिशादर्शक फलक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात येतील, असे ‘जीएचव्ही इंडिया’चे प्रकल्प व्यवस्थापक मधुकर पाटील यांनी सांगितले.

हायब्रीड एन्यूईटी योजना

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांपैकी काही किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारणा करण्यासाठी ही योजना राज्य शासनाने अंमलात आणली. यात प्रत्यक्ष बांधकामाचा कालावधी दोन वर्षे ही योजना शासन आणि खासगी भागधारक यांनी एकत्रितरीत्या  राबवायची आहे यामध्ये शासनाचा ६० टक्के आणि खासगी ४० टक्के  सहभाग राहणार आहे. या अंतर्गत बांधणार येणाऱ्या रस्त्यांची दहा वर्षे देखभाल-दुरुस्ती ठेकेदारांमार्फत  करावयाची आहे.

तांत्रिक अडचणी आल्याने काम थांबले होते, मात्र आता सुरू आहे. या प्रकल्पावर पूर्णपणे शासकीय नियंत्रण असून काम पूर्ण करवून घेण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील. सुरक्षेच्या आणि दिशादर्शक फलकसंबंधात झालेल्या पाहणीत ठेकेदाराला ते बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-विवेक बडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर