22 October 2020

News Flash

“आम्हाला खात्री आहे एकनाथ खडसे भाजपा सोबत राहतील”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

एकनाथ खडसे भाजपासोबतच राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. ज्यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे भाजपा सोडणार नाहीत असं म्हटलं आहे. मी महाराष्ट्र भाजपाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्याकडे त्यांचा राजीनामा आलेला नाही. तसंच इतर कुणाचाही राजीनामा आलेला नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र त्यानंतर विजयादशमी किंवा त्याआधी एकनाथ खडसे भाजपाला राम राम करुन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. आज काही वेळापूर्वी काही प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्याच्या बातम्या चालवल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजपा सोडलेलं नाही आणि राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देत माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही. तसंच एकनाथ खडसे हे पक्षासोबतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 8:49 pm

Web Title: i am confident that eknath khadse who is our senior leader will remain with the party says chandrkant patil scj 81
Next Stories
1 राज्यात दिवसभरात ११ हजार २०४ जण करोनामुक्त, १५० रुग्णांचा मृत्यू
2 भाजपा पक्ष सोडलेला नाही, राजीनामा दिलेला नाही-एकनाथ खडसे
3 “महिलांच्या लोकल प्रवासासाठी भाजपाचा घंटानाद का नाही?”
Just Now!
X