16 October 2019

News Flash

माझी प्रकृती ठणठणीत- गडकरींचं ट्विट

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने भोवळ आल्याचेही गडकरींनी म्हटले आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रकृती ठणठणीत असल्याचं ट्विट आता दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केला आहे. माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मला भोवळ आली होती. मात्र डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. आता माझी प्रकृती ठणठणीत आहे असे गडकरींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच हितचिंतकांचे त्यांनी आभारही मानले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात मंचावर भोवळ आली. मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना वेळीच सावरले. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभे असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. आता आपण ठीक आहोत असे ट्विट स्वतः नितीन गडकरींनीच केले आहे.

First Published on December 7, 2018 2:10 pm

Web Title: i am doing well now tweets nitin gadkari