पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावावर सर्वसंमती बनू शकते अशी चर्चा आहे. त्यासंबंधीच्या प्रश्नावर गडकरींनी आपण स्वप्न पाहत नाही असे उत्तर दिले. जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना हे माहित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील. आपण पंतप्रधानपदाच्य शर्यतीत नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मागच्या पाच वर्षात राहुल गांधींनी केलेल्या प्रगतीचे तुमच्यावर दडपण येते का ? आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींसमोर आव्हान आहे का ? त्यावर दोघांमध्ये तुलना होऊच शकत नाही. आम्ही २०१९ लोकसभा निवडणुकीत नक्कीच विजय मिळवू असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

शिवसेनेबरोबरच्या आघाडीच्या मुद्यावरही शिवसेनेबरोबर कुरबुरी असल्या तरी आम्हाला शिवसेनेसोबत आघाडी हवी आहे. शिवसेनेबरोबर आमचे दृढ संबंध आहेत असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले. ते आजतकच्या कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना हा भाजपाचा जुना मित्र पक्ष आहे. पण २०१४ विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला.

शिवसेना केंद्रात आणि राज्यातील सत्तेत भाजपासोबत सहभागी असली तरी सत्तेत अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे सातत्याने शिवसेनेकडून भाजपावर टीका सुरु असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी वेगवेगळया व्यासपीठावर जाहीरपणे शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पण शिवसेनेकडून युती संबंधी अद्याप कुठलेही सकारात्मक वक्तव्य आलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not in prime minister race nitin gadkari
First published on: 18-12-2018 at 13:45 IST