News Flash

प्रतीक पाटील म्हणतात मी भाजपाच्या वाटेवर नाही

राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे

प्रतिक पाटील

वसंतदादा घराणे हे काँग्रेसमध्येच रहाणार आहे, त्यांचे सदस्य भाजपात कधीच जाणार नाही असं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. प्रतीक पाटील यांनी नुकतीच महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रतीक पाटील हेदेखील भाजपाची वाट धरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काहीही झाले तरीही भाजपात जाणार नाही असे प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे.

स्वर्गीय वसंदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून सुरुवात केली आणि काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यात बळ दिलं. त्यांचाच वारसा पुढे आम्ही चालवत आहोत. काँग्रेस पक्षात आम्ही आहोत, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आमची जवळीक आहे. पण त्यांच्याशी झालेली चर्चा ही व्यक्तीगत स्वरूपाची होती त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये असं आवाहन प्रतीक पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि प्रतीक पाटील यांची भेट झाली. त्यामुळे प्रतीक पाटीलही भाजपात जाणार अशा चर्चांना खूप उधाण आलं होतं. मात्र प्रतीक पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.

काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुजय विखे पाटील यांनी १२ मार्चला भाजपात प्रवेश केला. त्यानंतर रणजीतसिंह मोहिते पाटील य़ांनीही भाजपात प्रवेश केला. या पाठोपाठ आता प्रतीक पाटीलही भाजपात जाणार का? या चर्चा रंगल्या होत्या मात्र मी भाजपात जाणार नाही असे प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे असेच म्हणता येईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 5:59 pm

Web Title: i am not joining bjp says congress leader pratik patil
Next Stories
1 धनंजय मुंडे म्हणतात, रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं
2 रामटेक, चंद्रपूरमध्ये काँग्रेसतर्फे नवीन चेहऱ्याला संधी
3 सैलानी यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
Just Now!
X