News Flash

…मी म्हातारा झालोय का ?: शरद पवार

"अजितने एक गोष्ट सांगितली ती मला काही आवडली नाही. या वयात सुद्धा साहेब फिरतात...."

संग्रहित छायाचित्र

शरद पवार या वयात सुद्धा फिरतात, असे सांगणाऱ्या अजित पवारांच्या विधानाचा शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे. अजितचं हे विधान मला काही आवडलेलं नाही. मी काय म्हातारा झालोय का?, असे शरद पवारांनी उपस्थितांना विचारताचा हशा पिकला होता. राज्यात आणि देशात परिवर्तन झाल्याशिवाय महाराष्ट्राचा सुपुत्र गप्प बसणार नाही, असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी रविवारी चिंचवडमध्ये नातू पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या प्रसंगी अजित पवार,जयंत पाटील,संजोर वाघेरे आदी नेते उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, अजितने एक गोष्ट सांगितली ती मला काही आवडली नाही. या वयात सुद्धा साहेब फिरतात….अरे,मी काय म्हातारा झालो का असं म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये हशा पिकला. पुढे ते म्हणाले, या राज्यात आणि देशात परिवर्तन झाल्याशिवाय महाराष्ट्राचा सुपुत्र गप्पा बसणार नाही. ५६ इंच छाती असल्याचं मी कधी सांगितले नाही. पण आमच्या मनगटात रग आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी शरद पवार यांनी चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी देखील प्रचार सभा घेतली. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअरस्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात तीनशेहून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी या सभेत केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2019 12:40 pm

Web Title: i am not old enough says ncp chief sharad pawar at chinchwad rally
Next Stories
1 सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का?, आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना चिमटा
2 दलित समाजाला ग्राह्य धरु नका, आठवलेंचा भाजपा- शिवसेनेला इशारा
3 संगमनेरमध्ये दोन हजार किलो गोमांस जप्त
Just Now!
X