News Flash

उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे

त्यांच्या कारभाराच्या प्रश्नावर म्हणाले....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत तसेच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडला नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात. मुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे. त्यांना पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाहीय. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात”.

आणखी वाचा- “डब्ल्यूएचओ काही माझ्याकडून सल्ले घेत नाही”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

“मी घराबाहेर पडलो तर, माझ्याभोवती लोकांची गर्दी जमा होणार. त्यातून संसर्गाची भीती होती. म्हणून मी बाहेर गेलो नाही. पण सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं” असे राज ठाकरे म्हणाले. “आता लॉकडाउनमधून सोडवा अशीच सर्व लोकांची इच्छा आहे. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. लॉकडाऊन फार काळ करता येणार नाही. विरोधी पक्षाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही लोकांच्या मनातील भीती दूर होण्याची गरज आहे. लॉकडाउनमुळे गेले काही महिने सूर्यप्रकाश ज्यांच्या घरापर्यतं पोहोचलेला नाही. त्याची अवस्था काय असेल याचा विचार करा” असे राज ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 10:51 am

Web Title: i seen chief minister uddhav thackeray only on tv raj thackeray dmp 82
Next Stories
1 राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मांडली राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल भूमिका; म्हणाले,…
2 आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे
3 “डब्ल्यूएचओ काही माझ्याकडून सल्ले घेत नाही”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
Just Now!
X