मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी शरद पवार यांच्या NOC ची म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्राची गरज लागणार नसावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. अशात रविवारीच शरद पवार यांनी सोलापुरात राम मंदिर बांधून करोना संपणार आहे का? असा प्रश्न विचारत मोदी सरकारला टोला लगावला होता. यावरुन आता प्रत्युत्तरांचे बाण चालू लागले आहेत. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आता राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला – संजय राऊत

एवढंच नाही तर त्यांनी ही देखील आठवण करुन दिली की उद्धव ठाकरे म्हणाले होते की ‘पहले मंदिर फिर सरकार’ मात्र ते आधी सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि राम मंदिर होतंय. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी शरद पवारांच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज उद्धव ठाकरेंना नसावी असा टोला त्यांनी आता लगावला आहे. टीव्ही ९ मराठीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- राम मंदिरामुळे करोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना टोला

उद्धव ठाकरेंनी विठ्ठलाला साकडं का घातलं?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ही टीका करत आहेत की मंदिर बांधून करोना जाणार नाही. याचं पूर्ण भान मोदी सरकारला आहे. मला त्यांना फक्त एकच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्र करोनामुक्त होऊ दे असं साकडं तुम्ही घातलं? असाही प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.