29 November 2020

News Flash

मी शर्यतीतही असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन – पंकजा मुंडे

दसरा मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले.

बीड : दसरा मेळाव्यात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे.

“जिंदगी की रेस मे जो आपको दौडकर हरा नही सकते वो आपको तोडकर हराने की कोशिश करते है”, अशा शब्दांत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दसऱ्यानिमित्त भगवान भक्ती गडावरुन पंकजा मुंडे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “जीवनाच्या रेसमध्ये मी कितीही पळायला तयार आहे. मात्र माझ्या लोकांची वज्रमुठ तोडलेली मला चालणार नाही. या वज्रमुठीच्या जोरावरच आम्ही अनेक लोकोपयोगी कामं केली आहेत. पुढच्या पाच वर्षात माझ्याच कामाचे नारळ फोडले जातील, इतकी काम आजवर केलीत. पुढेही हे काम असचं सुरु राहिल. मात्र, जीवनात काही लोक तुम्हाला हरवू पाहतात त्यासाठी ते तुमची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करतात.”

“बीड जिल्ह्याची मी भूमीपुत्र आहे. मी इथेच राहून देशाकडेही लक्ष देणार आहे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवायला दिल्लीतही आपण काही लोकांना पाठवू. कार्यकर्ते आणि जनतेसोबत माझं कर्जदाराचं नात आहे, या कर्जातून माझी मुक्त होण्याची इच्छा नाही,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

तसेच सत्ता असेल किंवा नसेल, पद असेल किंवा नसेल किंवा पदासंबंधीची प्रतिष्ठा असेल नसेल पण माझ्या लोकांचं प्रेम, आशीर्वाद आणि प्रेम कायम राहिलं याची मला खात्री आहे. लवकरच आम्ही महाराष्ट्र दौराही करणार आहोत. यावेळी लोकांपर्यंत पोहोचायचं काम तुम्हाला करायचंय तुमची जबाबदारी वाढली आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:39 pm

Web Title: i will be in the race and i will answer those who try to break us says pankaja munde aau 85
Next Stories
1 एकदा शिवाजी पार्क भरवायचं; पंकजा मुंडे यांचा निर्धार
2 करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती किती गंभीर आहे हे फडणवीसांना आता कळलं असेल – संजय राऊत
3 … या अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालो – खडसे
Just Now!
X