25 February 2020

News Flash

भाजपा प्रवेशाबाबत मनाला पटेल तो निर्णय घेईन-उदयनराजे

धाकट्या भावाला मदत करणारच असंही त्यांनी म्हटलं आहे

भाजपा प्रवेशाबाबत माझ्या मनाला पटेल तो निर्णय मी घेईन धाकट्या भावाला मदत केलीच पाहिजे. मात्र रामराजे आणि शिवेंद्रराजे ही मोठी माणसं आहेत माझी त्यांच्याशी बरोबरी करु नका असे उदयनराजेंनी म्हटले आहे. सातारा या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उदयनराजेंना भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. तुमच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आहे असे पत्रकारांनी विचारले तेव्हा चर्चा तर सुरु राहणारच पण काय करायचं याचा विचार मी केलेला नाही. माझ्या मनाला पटेल तोच निर्णय मी घेईन असे उदयनराजेंनी म्हटले आहे.

तुम्ही आणि रामराजे एकाच दिवशी भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत असं विचारलं असता, रामराजे हे राजे आहेत माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही मात्र तुम्ही मला त्यांच्याशी जोडू नका असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. उदयनराजे कोणत्याही पक्षात असतील तरीही मला मदत करतील असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे याबाबत विचारलं असता लहान भावाला मदत केलीच पाहिजे असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. लहान मुलाने मांडीवर एखादी गोष्ट केली म्हणून आपण मांडी कापून टाकत नाही. शिवेंद्रराजे तर माझे लाडके बंधू आहेत त्यांना मदत करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का? हे विचारलं असता यात्रा तर सगळ्याच्या असतात आणि आमची तर जत्रा आहे असं उत्तर त्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारलं असता, उदयनराजे म्हटले की मी फक्त पूरग्रस्तांना मदत करा हा एकच विषय समोर ठेवून मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्या भेटीचा दुसरा काहीही अर्थ काढू नका. मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांसोबत माझी मैत्री आहे असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

 

First Published on August 23, 2019 8:47 pm

Web Title: i will decide about my bjp joining says udayanrajne scj 81
Next Stories
1 काँग्रेस राष्ट्रवादीने ‘महागळती’ची चिंता करावी-मुख्यमंत्री
2 कोल्हापूरच्या पुराला आघाडी सरकार जबाबदार-चंद्रकांत पाटील
3 लंडनमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही – रामदास आठवले
Just Now!
X