कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून काही झाले तरी मी देखील जाणार असल्याची भूमिका भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यानी मांडली. रविवारी रात्री आझाद यांचे पुणे येथे आगमन झाले. पुणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळा माध्यमांशी बोलताना आझाद म्हणाला की , पुण्यातील सभेला येथील प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली नसल्याने भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष या निर्णया विरोधात न्यायालयात गेले आहेत. या बाबतचा निर्णय उद्या सकाळी येणार आहे. आमच्या बाजूने निर्णय आल्यास आम्ही सभा घेऊ जर आमच्या विरोधात निर्णय गेल्यास आम्ही नागरिकांमध्ये जाऊन आता पर्यंत घडलेला प्रकार सांगू.
ते पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाना मार्फत व्यक्ति स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा विसर या सरकारला पडला आहे. या सरकारच्या कारभारावरून नागरिकांचा विश्वास उडाला असल्याने आता हे सरकार दंगली घडवून राजकारण खेळण्याचा प्रयत्न हे करीत आहे. आता आम्ही हे सरकार पडणार आहोत, अशा शब्दात भाजपा सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
ज्या व्यक्तीनी गतवर्षी दंगली घडवल्या. त्यांना अटक करण्यात आली नसून आम्ही काही केले नसताना. आमच्यावर अन्याय का? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 8:16 am